मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी आंदोलक एसटी कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) अशा ११० जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज सदावर्तेंची कोठडी संपली असून, पोलिसांनी मुंबईतील (Mumbai Police) गिरगाव कोर्टात हजर केलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन पोलीस गिरगाव कोर्टात दाखल झाले असून, काही वेळातच त्यांना आता कोठडी मिळणार की जामीन मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, ती आज संपली असल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं आहे. तर सदावर्तेंच्या चौकशीसाठी पोलीस आणखी कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसरीकडे सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या एका प्रकरणात सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी फलटण पोलीस देखील मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पुढच्या काही तासांत घडणाऱ्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत.