वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे सध्या अडचणीत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर (Silver Oak Attack Case) कट रचल्याच्या आरोपात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना अटक केली होती. त्या प्रकरणात त्यांना १४ दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर त्यांना सातारा न्यायालयाने देखील एका प्रकरणात ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानतंर आता सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील या फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या जयश्री पाटील यांनी सदावर्तेंच्या अटकेनंतर आपल्या पतीचा खून होऊ शकतो असं म्हटलं होतं. त्यानंतर जयश्री पाटील यांना देखील सरकारी वकीलांना या प्रकरणात आरोप असल्याचं म्हटलं. त्यानंतर आता जयश्री पाटील या फरार असल्याचं समजतंय.
जयश्री पाटील या स्वत: वकील असून, त्यांनी आजवर अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये न्यायालयात बाजू मांडली आहे. मराठा आरक्षणाविरोधात केलेल्या याचिकेनंतर त्या राज्यभरात चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात देखील त्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील आणि त्यांचे पती असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत होत्या. त्यानंतर आता त्या गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मिळालेलं पोलीस संरक्षण देखील त्यांनी सोडल्याचं समजतंय.