गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संप (st worker strike) सुरु आहे. या संपासंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आदेश उच्च न्यायालयाने (mumbai high court)दिल्याची बातमी सकाळी होती. मात्र, एसटी महामंडळाचे वकील गुणवंत सदावर्ते यांनी इन्कार केला. कामावर कधी रुजू व्हावे, यांची कोणतीही मुदत न्यायालयाने दिली नाही. डेडलाइन हे शब्द अतिरेक्यांसाठी असतात. आम्ही न्यायालयाच्या निकालाची प्रत पाहून निर्णय घेऊ, असे गुणवंत सदावर्ते (gunvant sadavarte)यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचेही आदेश दिले आहेत. कोविडचा भत्ता देण्याचेही स्पष्ट आदेश दिले आहेत. प्रत्येक डेपोला ९५ लाख कोविड भत्ता देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निकालाची प्रत आल्यावर आम्ही संप मागे घ्यायचा का नाही यासंदर्भात निर्णय घेऊ, असे सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.