Gunratna Sadavarte, Arthur Road Jail Team Lokshahi
ताज्या बातम्या

Gunratna Sadavarte यांना आता सातारा पोलीस ताब्यात घेतील; सरकारी वकीलांची माहिती

गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी आता मुंबईतील अर्थर रोड तुरुंगात करण्यात येणार आहे.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात (Silver Oak Attack Case) आरोपी क्रमांक एक असलेल्या गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) न्यायालयीन सुनावण्यात आली असून, इतर दोन आरोपींना १६ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तसंच सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेण्याची परवानगी मागितली होती, ती त्यांना देण्यात आली आहे. सातारा पोलिसांना अर्थर रोड तुरुंगात जाऊन सदावर्तेंचा ताबा घ्यावा लागेल असं सरकारी वकील प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी सांगितलं.

मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलत असताना केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातील फलटनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात फलटन पोलीसांनी देखील सदावर्तेंचा ताबा मागितला होता. त्यानंतर न्यायालयाने साताऱ्यातील फलटन पोलिसांना सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. मुंबई पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांना देण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आता पुढच्या काही तासांत सदावर्ते यांना अर्थर रोड तुरुंगात हलवण्यात आल्यानंतर सातारा पोलिसांना अर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून त्यांचा ताबा घ्यावा लागेल अशी माहिती सरकारी वकीलांनी दिली आहे. तर दुसरीकडे सदावर्तेंना आता वरच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज देखील करता येणार आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांत घडणाऱ्या घडामोडी महत्वाच्या असणार आहेत.

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

अभिनेता शाहरुख खान धमकीप्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केलं तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल