Gunratna Sadavarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

Gunratna Sadavarte यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Silver Oak Attack Case : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार झाल्याची माहिती सरकारी वकीलांनी कोर्टात दिली.

Published by : Sudhir Kakde

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना सुनावण्यात आलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपली असून, सदावर्तेंना आज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. पोलिसांनी पुन्हा एकाद सदावर्तेंना कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. सरकारी वकील प्रदीप घरत (Pradip Gharat) यांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती, त्यानंतर सर्व पुरावे जर पोलिसांकडे आहे तर मग पोलीस कोठडी कशासाठी असा सवाल सदावर्तेंच्या वकीलांनी उपस्थित केला होता. (Gunratna Sadavarte Judicial Custody)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर पोलिसांनी ११० आरोपींना ताब्यात घेतलं होतं. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते नाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना न्यायालयाने दोन वेळा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं होतं.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलत असताना केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातील फलटनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात फलटन पोलीसांनी देखील सदावर्तेंचा ताबा मागितला होता. त्यामुळे आता याबद्दल न्यायालय काय आदेश देणार, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिंदेंचे सहकारी अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा

'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केलं तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल

Influencer इम्शा रहमानचा MMS व्हिडिओ ऑनलाइन लीक, कोण आहे इम्शा?

Mega Block: मुंबईत 16-17 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक; जाणून घ्या वेळा