गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय खूप चर्चेत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली वेळ संपली आहे. त्यानंतर आता जरांगे पटलांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकारने आरक्षण द्यावं अन्यथा चर्चा नाही. असं जरांगेंनी सांगितल्यानंतर त्यांचे पडसाद आता उमटायला लागले आहेत.
मराठा आरक्षण दिल्यानंतर त्यांचे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते हे मराठा आंदोलकाच्या निशाणावर आले आहेत. त्यांची गाडी फोडण्यात आली आहे. त्यांचा विरोध का केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. गुणरत्न सदावर्ते का बोलतायत? का विरोध करतायत? अशा चर्चांणा आता उधाण आलं आहे. या सर्व विषयांवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी लोकशाही मराठी पोडकस्टमध्ये चर्चा केली आहे.