हिंगोली परभणी नंतर आज नांदेड मध्ये मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार आहे. या रॅली साठी पाच लाखाहून अधिक मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार असून शाळा महाविद्यालयाला एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या सुट्टीला ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कोणतीही रॅली बाधक ठरत असेल तर ती रॅली थांबवा, शिक्षण महत्वाचे आहे, रॅली महत्वाची नाही. रॅलीसाठी आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं हे थांबवले पाहिजे, सुट्टी जाहीर करणाऱ्या जवाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी सभापती, मुख्य सचिव, शिक्षण विभागाकडे केलीय.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचं ठीक अकरा वाजता हिंगोली शहरात आगमन झाल्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे. १३ जूनपर्यंत ही शांतता रॅली असणार आहे. शासनाने सगेसोयरे अंमलबजावणीचा शब्द दिलाय, तो पूर्ण करावा अशी जरांगेंची मागणी आहे.