गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण केलं होतं.
परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये असणाऱ्या घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती.सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला जात आहे.
सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.