राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावर अनेक प्रतिक्रिया देखिल आल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट करत मी राष्ट्रवादीसोबतच राहणार असे सांगितले.
त्यानंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत. आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत. असे त्यांनी विधान केलं.
त्यांच्या या विधानाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. यावर आता काँग्रेसची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.