शिवसेनेच्या चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे ही बैठक झाली. या बैठकीत शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपापसातल्या भांडणामुळे आपल्या पक्षाचे नुकसान होणार आहे. हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या निवडणुकांसाठी कामाला लागलं पाहिजे. जर तुम्ही विश्वासघात करत असाल तर तुम्ही स्वतःचाही विश्वासघात करत आहात. हे लक्षात ठेवा उद्या जर तुम्हाला गुलाबराव पाटील हे नावच पक्षात नको असेल तर तसेही सांगा.
तसेच तुम्ही जे सांगणार ते मी करायला तयार आहे. तुम्ही सांगण्याप्रमाणे मी वागतो आहे. तरीदेखील तुम्ही आपापसात भांडत आहात. येत्या निवडणुकांमध्ये आपापसात न भांडता निवडणुकांना सामोरे जा आणि जिल्ह्यावर भगवा फडकवा. असे गुलाबराव पाटील म्हणाले.