भाजपचे आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यामध्ये मोठा वाद झाला असून महेश गायकवाड यांच्यावर गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या आरोप होत आहें यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'मला याबाबत काहीही माहिती नाही तो वाद नेमका काय वाद आहे मी याबाबत काही बोलू शकत नाही' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, पोलिसांनी संरक्षणासाठी आपल्याला पिस्तूल दिले आहे कुणाला मारण्याकरता पिस्तूल आपल्याला दिले नाही आमदारांनी कुठे मारलं काय मारलं ते मला माहित नाही जोपर्यंत मी घटनेची पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करणे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्या वादप्रकरणी दिली आहे.
दरम्यान, उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी जमले होते. भाजप आमदार गणपत गायकवाड त्यांचे कार्यकर्ते तसेच कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व त्यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते.
आपापसातील वाद मिटवण्यासाठी हे पदाधिकारी जमले होते. या दरम्यान झालेल्या वादावादीतून ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे कल्याण परिसरात तणावाचे वतावरण असून कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड व भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.