गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून सुमारे 500 जण नदीत पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती . मोरबी इथल्या मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली असून दुर्घटनेत 132 जणांचा मृत्यू झाला आहे.
काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे 500 लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवरील केबल पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. छठ पूजासाठी येथे शेकडो लोक उपस्थित राहिले होते.
यावेळी पूलावर असणारे चारशे पेक्षा जास्त लोक नदीत बुड्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलाची दुरुस्ती केली होती. या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. दरम्यान, जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 132 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पीएमएनआरएफमधून ही मदत देण्यात येणार आहे.