निसार शेख| चिपळूण: अॅाक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणा-या राज्यातील ३४० तालुक्यातील ७७५१ ग्रामपंयतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तर १८ डिसेंबर २०२२ ला मतदान आणि २० डिसेंबर २०२२ ला होणार निकाल जाहीर होणार आहे.
त्यामध्ये चिपळूण तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींचा समावेश आहे त्यामध्ये शिरगाव,भिले, कामथे, वहाल,बामणोली,देवखेरकी, शिरवली, ओमली,नारदखेरकी,खांदाड पाली,परशुराम,पेढे, असूर्डे, आंबतखोल, कापरे,करबवणे, केतकी,बिवली,मालदोली, कलकवने,गाणे,नवीन कोळकेवाडी , धामेली कोडं, भीले,कामथे खुर्द, अबिटगाव, खांडोत्री,गुळवणे, ढाकमोली, गूढे, उमरोली,गोंधले या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे .