ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु आहे. जिल्ह्यातील धक्कादायक निकाल हाती येत आहेत. शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे कागल तालुक्यात तीन ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे.सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी शाहू आघाडीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे, तर महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात होत्या. सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या.