ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा मिळवते. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
करवीर तालुक्यात कावणे गावचा निकाल पहिल्यांदा जाहीर झाला. शुभांगी प्रतापसिंह पाटील भाजप सरपंचपदी निवडून आल्या. नांदेडच्या चिमेगावात एकनाथ शिंदे गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती. या ग्राम पंचायतीचा निकाल हाती आला असून काँग्रेसचा सरपंच निवडून आला आहे. तर ग्राम पंचायतवर शिंदे-काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.
शिंदे गटाने काँग्रेसशी सलगी करून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कोल्हापुरात भाजपाने राष्ट्रवादीला पछाडले असून हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये चार ग्रा. पंचायतींवर विजय मिळविला आहे.