govind pansare murder case | CBI | ATS  team lokshahi
ताज्या बातम्या

गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यास हरकत नाही; उच्च न्यायालय

एसआयटी अधिकारी एटीएसमध्ये रुजू होऊ शकतो का?

Published by : Team Lokshahi

govind pansare murder case : गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे वर्ग करण्यास हरकत नसल्याची भूमिका सोमवारी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने उच्च न्यायालयात मांडली. SIT ची संपूर्ण रचना बदलून कोणता उद्देश साध्य होईल? या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा तुमचाही हेतू असायला हवा, असे शेवटी उच्च न्यायालयाने म्हटले. (govind pansare murder case to ats)

नव्याने सुरुवात करावी लागेल

तसेच हे प्रकरण एटीएसकडे वर्ग केल्यास इतक्या वर्षांनंतरही त्यांना नव्याने तपास सुरू करावा लागेल. त्यामुळे एसआयटी अधिकारी एटीएसमध्ये रुजू होऊ शकतो का? जेणेकरून तपासात बराच वेळ वाचू शकेल. यासंदर्भात राज्य सरकारला सूचना करण्याचे निर्देश देत सुनावणी 3 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

अनीसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात आणि १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोल्हापुरातील या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते.

मात्र, इतक्या वर्षांच्या तपासानंतरही एसआयटीला काहीच हाती न लागल्याने एसआयटीच्या तपासावर असंतुष्ट पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचा तपास अन्य तपास यंत्रणेकडे सोपवावा आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result