Government Job : भारतीय हवाई दलाने कुक, हाऊस कीपिंग स्टाफ आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उमेदवार ऑफलाइन अर्ज (Application) करू शकतात. या भरती (Recruitment) प्रक्रियेद्वारे एकूण 15 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये अया/वॉर्ड असिस्टंटच्या 2 पदे, कुकच्या 9 पदे, हाऊस किपिंग स्टाफच्या 2 पदे आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या 2 पदांचा समावेश आहे. (latest government jobs for 10th 12th and graduates check details)
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (SCI) कनिष्ठ न्यायालय सहाय्यकांच्या 210 पदांसाठी भरती आहे. या पदांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार sci.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2022 आहे. या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना HRA सह सध्याच्या भत्त्यांच्या दरानुसार दरमहा 63,068 रुपये वेतन दिले जाईल. उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे.
आर्मी इन्फंट्री स्कूल 2022 च्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
या संदर्भात अधिसूचना प्रकाशित झाल्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतील, तथापि अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2022 आहे. मध्य प्रदेशातील महू स्टेशन आणि कर्नाटकातील बेळगाव स्टेशनवर उमेदवारांची भरती केली जाईल.
संरक्षण मंत्रालय लवकरच मुख्यालय आर्मी इन्फंट्री स्कूलमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. त्याअंतर्गत ड्राफ्ट्समन, लोअर डिव्हिजन क्लर्क, ड्रायव्हर, कुक यासह अन्य पदे भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jointerritorialarmy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीवर आधारित असेल.
उमेदवारांकडून 200 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. उमेदवारांनी परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४२ वर्षे असावे.