गेल्या दोन वर्षांपासून कोरोणामुळे पंढरीच्या वारीला (pandhari vari)वारकर्यांना जाता आलं नाही. वारकऱ्यांच्या मनामध्ये याच अतीव दुःख होतं. याचे कारण वारीची परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत आलेली आहे. काही काही लोकांचे तर चाळीसावी पन्नासावी वारी असते. त्यामुळे गेल्या दोन वर्षात ही वारीची परंपरा खंडित झाल्यामुळे अनेक वारकरी हताश झाले होते. परंतु यंदा पंढरीच्या वारीचा (pandhari vari) सोहळा दिमाखात पार पडणार आहे. सरकारने याला परवानगी दिली आहे.
संत ज्ञानेश्वरांच्या (sant dnyaneshwar)पालखीचे प्रस्थान 21 जून रोजी होईल. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृद्धी झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहनपास दिले जातील, अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे 251 दिंड्या नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणी नसलेल्या 125 ते 150 दिंड्या आहेत. सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील. वाहनपासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने 15 मे पर्यंत वाहनांचे नंबर, वाहनचालकाचे नांव व मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत. यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख वारकरी असतील. त्यादृष्टीने पालखीतळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता व सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असं पालखीसोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील म्हणाले.