Gopichand Padalkar Team Lokshahi
ताज्या बातम्या

Gopichand Padalkar : उदय सामंतांवर हल्ला करणारी पवारांची माणसं

Published by : Team Lokshahi

संजय देसाई, सांगली

गळ्यात भगवे मफलर घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेत घोषणाबाजी करत आहेत, याच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या कडूनच उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.तसेच "म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा",अशी अवस्था राष्ट्रवादी,शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे,अश्या बोचऱ्या शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे,ते आटपाडी मध्ये बोलत होते.

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेला "निष्ठा यात्रा आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्यात भगवा मफरेल घालून घोषणाबाजी करत आहेत,ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत,तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत,त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत सुरू आहे. "म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा",अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अश्या शब्दात पडळकरांनी टीका केली आहे.

तसेच पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला आहे पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत,त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची कार्यकर्ते आहेत,त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा,आरोप करत याआधी आपल्यावर हल्ले झाले,ते राष्ट्रवादीकडून झाले होते,असेही आमदार पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

CM Eknath Shinde: जुहू चौपाटी स्वच्छता मोहिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amit Thackeray : सिनेट निवडणूक स्थगितीवरून अमित ठाकरेंची टीका; पोस्ट करत म्हणाले...

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; संजय राऊत म्हणाले...

AFG vs SA ODI: अफगाणिस्तान आफ्रिकेला 134 धावांत गुंडाळून दुसरा सामना 177 धावांनी जिंकला; मालिका 2-0 जिंकले

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन