ताज्या बातम्या

जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढलं, हे संपूर्ण कायदेशीर आहे; गोपीचंद पडळकर

मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने पाडण्यात आले

Published by : Siddhi Naringrekar

मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्यायाने पाडण्यात आल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून, स्थानिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूय. दरम्यान ब्रह्मानंद पडळकर हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत.आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्राह्मनंद पडळकर यांनी जे बांधकाम पाडले आहे ते चुकीचं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. मिरजमधील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर म्हणाले की, . मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी मिरज शहरातील जेसीबी च्या साह्याने अतिक्रमण काढल आहे. हे संपूर्ण कायदेशीर असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. ते कोल्हापुरात बोलत होते.

रात्रीच्या अंधारात जरी हे अतिक्रमण काढल असलं तरी देखील हे कायदेशीर असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती रहदारी असते. त्यामुळे अतिक्रमण काढण्यास अडचण येते म्हणूनच रात्री हे अतिक्रमण काढलं असल्याचं समर्थनही त्यांनी केला आहे. यामध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नसून दरम्यान पोलिसांनी जी काही कारवाई केली ती मला माहित नाही. तिकडं गेल्यावर पाहिली जाईल. असे पडळकर यांनी म्हटलं आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी