भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा नाव न घेता शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा गेले पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या कळपात घुसला आहे. मी पुरोगामी आहे, मी या जातीचं कल्याण करतो, त्या जातीचं कल्याण करतो... हा बुरखा घातलेला लांडगा बहुजनांच्या मुलांना आता माहिती झालाय अशी जहरी टीका आज शरद गोपीचंद पडळकरांनी केली. गोपीचंद पडळकर यांनी कामशेतच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात उपस्थितांना संबोधित केलं.
गोपीचंद पडळकर हे नेहमीच शरद पवारांवर निशाणा साधत असतात. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे. शरद पवारांवर बोलताना ते म्हणाले की, कोणी चळवळी फोडल्या, बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्ष कोणी फोडला असे सवाल त्यांनी केले. तसंच पुढे ते म्हणले की, धनगर समाजाची लढाई 1990 साली चांदा पासून ते बांद्या पर्यंत बी. के. गोकरे यांची चळवळ कोणी फोडली हे सर्व बहुजन च्या लोकांना आता माहिती झालं आहे.