Gopichand Padalkar - Sharad Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

'शकुनी काकांचा ST बँकेची हजारो कोटींची संपत्ती गिळण्याचा डाव'

Published by : Sudhir Kakde

सांगली | संजय देसाई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Workers) मुद्दा चर्चेत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांश कर्मचारी हे कामावर रुजू झाले असून, उर्वरीत कर्मचारी देखील कामावर येत आहेत. मात्र तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शकुनी काका म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघात केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखलाय. बँकेची निवडणूक घोषीत केली आहे. जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय. साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, 1995 ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून घेतलं. सभासद फीसच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रूपये वसूल केले. त्याव्यतिरिक्त अधिवेशनाच्या नावाखाली 500 रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम, अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास 100 कोटी रूपये गिळंकृत केले. त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना 20-20 लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या. मात्र ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो. त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा असणाऱ्या लोकांनी आपल्या सिल्व्हर ओकवरून माणुसकीखातीर एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही. जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या 135 विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार असल्याचा घणाघात आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला धक्का; शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेश

महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद; कोणत्या घोषणा करण्यात येणार?

महाराष्ट्रात आज आचारसंहिता लागण्याची शक्यता

सलमाच्या जीवावर का उठला आहे लॉरेन्स बिश्नोई?

Manushi Chhillar: लॅक्मे फॅशन वीकमध्ये मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचा कमाल लूक; एकदा पाहाच