ताज्या बातम्या

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! आगामी गणेशोत्सवासाठी धावणार 'इतक्या' रेल्वेगाड्या, रेल्वे प्रशासनाने दिली महत्त्वाची अपडेट

रेल्वे प्रशासनाकडून आगामी गणेशोत्सवासाठी २०२ गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Published by : Team Lokshahi

रेल्वे प्रशासनाकडून आगामी गणेशोत्सवासाठी २०२ गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. यामध्ये आणखी २० रेल्वेगाड्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे गणपती उस्तवात प्रवाशांसाठी एकूण २२२ रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

१) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-रत्नागिरी द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)

01031 विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दि.०६.०९.२०२४, दि.०७.०९.२०२४, दि.१३.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी २०:०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४, दि. ०८.०९.२०२४, दि. १४.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी ०८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: २ वातानुकूलित-द्वितीय, ६ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२१ डब्बे)

२) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

01443 विशेष गाडी पनवेल येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

01444 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

३) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

01447 विशेष गाडी पुणे येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

01448 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०८.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. (२२ डब्बे)

४) पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)

01441 विशेष गाडी दि. ११.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

01442 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे: पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)

५) पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष (२ फेऱ्या)

01445 विशेष गाडी दि. १०.०९.२०२४ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

01446 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ११.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पोहोचेल. (१ फेरी)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

संरचना: ३ वातानुकूलित-द्वितीय, १५ वातानुकूलित-तृतीय, १ गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२० डब्बे)

आरक्षण: वरील सर्व गणपती विशेष गाड्यांची बुकिंग दि. ०७.०८.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर उघडेल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

दिनांक: ५ ऑगस्ट २०२४

प्रप क्रमांक: २०२४/०८/०७

सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.

Diwali 2024 : दिवाळीत पहिली आंघोळ का व कसे करावे? जाणून घ्या पद्धत!

13 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत एक्झिट पोलवर बंदी

Rohit Pawar पाडणार उद्धव ठाकरेंचा उमेदवार?

धाराशिवमधील 'शिवाकाशी'ने बदललं हजारो तरुणांचे जीवन; तेरखेडा गावचं रुपडं पालटलं

'कोकण सेनेचंच, फडणवीस-दादांचंही यावर शिक्कामोर्तब' रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य