ऐन सण-उत्सवाच्या काळात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. या भाववाढीमुळे सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे.
मे महिन्यात सोने 75,100 रुपये अशा उच्चांकी भावावर पोहोचले होते. नंतर भाव कमी झाले. सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
बुधवारी सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ होऊन ते 76 हजार 100 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलं. याच्या आधी मंगळवारी सोन्याच्या दरात 600 रुपयांची वाढ होऊन ते 75 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते.
सलग दुसऱ्या दिवशी सोने पुन्हा नव्या उच्चांकी भावावर पोहचले आहे. सोने 500 तर चांदी 1 हजार 922 रुपयांनी महागलं असल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर प्रतितोळा 76 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दर 90 हजारांवर गेले आहेत.