अमोल धर्माधिकारी, पुणे
कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता येरवडा कारागृहामध्ये आरोपींची ओळख परेड काढण्यात आली.
बलात्कार प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांकडून ओळख परेड घेण्यात आली असून ओळख परेड करताना पिडीता आणि तिच्या मित्राची उपस्थिती असल्याची माहिती मिळत आहे.
दोन दिवस येरवडा कारागृहामध्ये ओळख परेड घेण्यात आली. समान शरीरयष्टी असलेले बारा जण उभे करून आरोपींची ओळख पटवण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भातील गोपनीय अहवाल तहसीलदाराकडून दिला जाणार असून हा अहवाल न्यायालयात सादर करून पुराव्याचा भाग म्हणून वापरला जाणार आहे.