ताज्या बातम्या

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; 300हून अधिक पोलील कर्मचारी आरोपींच्या मागावर

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला.

गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर तीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी आरोपींच्या मागावर असल्याची माहिती मिळत आहे.

तपासासाठी अन्य जिल्ह्यांतील पोलीस अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह विविध तपास पथकांकडून आरोपींचा शोध सुरू असून अन्य जिल्ह्यांतील काही सक्षम पोलीस अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात येत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

Mns Candidate List: मोठी बातमी! मनसेची 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

MVA Seat Formula ; विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर! हा असेल फॉर्म्युला

Bhaskar Jadhav on Shivsena UBT Candidate List: भास्कर जाधवांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले जाधव

Sushama Andhare | शिवसेना उबाटाची यादी जाहीर, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया