ताज्या बातम्या

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला.

गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणात आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार, असे पोलिसांनी जाहीर केलं असून 200 पेक्षा अधिक संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती संकलित केली असल्याची माहिती मिळत आहे.

Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमा कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त, महत्त्व, पूजा पध्दत

Shubham Lonkar: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक

Baba Siddiqui: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश, आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, हृदयात ब्लॉकेज

'इतर राज्यातून येऊन मुंबईत केलेली दादागिरी आम्ही खपवून...' बाबा सिद्दीकी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप