अमोल धर्माधिकारी, पुणे
कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपींचा शोध घेणं सुरू होते.
याच पार्श्वभूमीवर या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी दिली. या घटनेतील एक आरोपी अटकेत तर अन्य दोघांचा शोध सुरु होता.
तिघे ही आरोपी मध्य प्रदेशातील असून पुण्यात कचरा वेचण्याच काम करायचे. अटक केलेल्या आरोपीचं नाव चंद्रकुमार कनोजिया असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आले आहे. अख्तर अली शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.