आज महिला दिन. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महिलांना भेट देण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर १०० रुपयांनी कमी करण्यात आले आहे. ही माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की, महिला दिनाच्या निमित्ताने गॅस सिलेंडरचे दर शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईल. तसेच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.