Rajastan Team Lokshahi
ताज्या बातम्या

बापरे! रस्त्यावर वाहू लागली तुपाची नदी; भांडी घेऊन तुप गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

Published by : Siddhi Naringrekar

देशात अगदी महागाईची (Inflation) लाटच पसरली आहे. या वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.

तेलाचे, तुपाचे (ghee) भाव अगदी गगनाला भिडले आहेत आणि यातच अचानक आपल्याला कुठेतरी तुप किंवा तेल वाहताना दिसत असेल तर, तुम्ही काय कराल?

तर अशीच एक घटना राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात घटली आहे. एका दुर्घटनेमुळे ग्रामस्थांना मोफत तूप मिळालं. हे तूप गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. गावातील सर्व लोक हंडा, कळशी, बादली, भांडी जी मिळेल ती वस्तू घेऊन तूप गोळा करायला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

जी माहिती मिळाली त्यानुसार स्वरुपगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अजब प्रकार घडला. या ठिकाणी शनिवारी एक टँकर उलटला. गांधीधामहून रुद्रपूरला जाणाऱ्या टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकरने दुभाजकाला धडक दिली. अपघातानंतर टँकर उलटला.

अपघातानंतर टँकरचं इंजिन आणि केबिनवाला भाग वेगळा झाला. तो रस्त्यापासून दूर 200 मीटर अंतरावर जाऊन पडला. टँकर शेतात पडल्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं तूप वाहून जाऊ लागलं. याची माहिती जवळच्या लोकांनी मिळाली. त्यानंतर तिथे ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली.

हातात बादली, बाटली, कॅन घेऊन अनेकांनी अपघातस्थळ गाठलं. थोड्यावेळाने पोलिसांनी ग्रामस्थांना तिथून बाजुला केलं, अपघातस्थळी क्रेन बोलावण्यात आली आणि टँकर हायवेवरून हटवण्यात आला

Badlapur Sexual Assault: बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर

Pune International Airport: पुणे विमानतळाला 'जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे' नाव; राज्य सरकारचा निर्णय

Badlapur Sexual Assault : आरोपी अक्षय शिंदे याचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रधानमंत्री मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून बैठकीत आढावा

Pitru Paksha: पितृपक्षात कावळ्याला जेवण दाखवलं जाते, काय आहे पितृपक्षाशी कावळ्याचा संबंध? जाणून घ्या...