सुरेश वायभट/पैठण; या वर्षी श्रावणामध्ये अतिरिक्त महिना असल्याने तो 59 दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा आहे. दर तीन वर्षांतून एकदा, वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो, ज्याला अधिक मास म्हणतात. याचं निम्मिताने गंगा पूजन व गंगेला साडी ओढण्याचा कार्यक्रम माहेश्वरी महिलांच्या वतीने घेण्यात आला.
सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने गोदावरी नदीच्या स्नानासाठी व एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. आज त्या निमित्ताने पैठण येथील माहेश्वरी समाजाच्या मिनाक्षी लोहिया, दीपा राठी, तृप्ती मानधने, सोनल पारिक या महिलांनी एकत्र येत समाजाच्या 60 महिलांचा ग्रुप करून हा चुनरी मनोरथ व गंगा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एक आगळा वेगळा कार्यक्रम गोदावरी नदीच्या काठावर आज घेण्यात आला. संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात साडीच्या रोलचे विधिवत पूजन करुन संकल्प सोडून गंगेची ओटी भरून, नावपूजन करून गंगा चुनरी पूजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.