आज 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, वाहनांची वर्दळ यामुळे काही मार्ग आज बंद असणार आहेत. सकाळी 7 वाजेपासून तर गणेश विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत हे मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.
सिटीचौक पोलीस स्टेशन पश्चिमेकडील बु-हाणी हायस्कूलकडे जाणारी गल्ली.
अंजली टॉकीज, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबुराव काळे चौक.
सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.
सावरकर चौक, एम. पी. लॉ कॉलेज, महात्मा फुले पुतळा/ बळवंत वाचनालय चौक.
सिटीचौक ते जुनाबाजार मार्गे भडकलगेट.
चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
बुढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट- मोंढा ते राजाबाजार.
निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
लोटाकारंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
तसेच सिटी चौकच्या पाठीमागील रोडने वाहतूक चालू राहणार आहे. क्रांतीचौकाकडून येणारी सर्व वाहने सिल्लेखाना चौक, समर्थनगर चौक मार्गे बसस्थानकाकडे वळवण्यात येणार आहे.