ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील बाजार फुलला

दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील बाजार आणि रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. एका बाजूला मोठय़ा रस्त्यांवरून सार्वजनिक गणपतींचे आगमन होत असताना दुसऱ्या बाजूला गल्लोगल्लीच्या बाजारांत घरगुती गणपतींसाठी खरेदीची लगबग सुरू आहे. पर्यावरणस्नेही मखरांची विक्री यंदा वाढली आहे. यात कापडी मखर ट्रेनच्या गर्दीतूनही सहज घेऊन जाता येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गौरीसाठी अंबाडा, हिरव्या बांगडय़ा आणि इतर अलंकार यांची खरेदी महिलावर्ग गणपतीच्या खरेदीबरोबरच उरकत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मुंबईतील लालबाग आणि दादर ही मोक्याची ठिकाणे आहेत. गौरी-गणपतीसाठी अलंकार, पूजेचे साहित्य, प्रसाद, सजावट अशा सर्वच गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने दोन्ही बाजारांत भाविक एकवटले आहेत.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मुंबईतील लालबाग आणि दादर ही मोक्याची ठिकाणे आहेत. गणपतीच्या मागे लावण्यासाठी रंगीत, नक्षीदार कापड, मंडपाला लावण्यासाठी सुपारी, सीताफळ, इत्यादी साहित्याची खरेदीही ऐन वेळी सुरू आहे. नवनवीन आरत्या असणारी पुस्तके घेण्याकडे भक्तांचा कल दिसून येतो.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती