पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सिद्धू मूसेवाला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, सिद्धधू यांच्या शरीरावर 19 जखमांच्या खुणा आढळल्या असून, शरीरात एक गोळी ही सापडली. तसेच, सिद्धू यांच्या खांद्यावर आणि मांड्यांवर जखमांच्या खुणा असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले. दरम्यान, आज सिद्धू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिद्धू मूसेवाला यांचा शवविच्छेदन (post mortem) अहवाल लवकरच सीलबंद लिफाफ्यामध्ये पोलिसांना (Police) पाठवणार असल्याचे मानसा सिव्हिल हॉस्पिटलचे (Manasa Civil Hospital) सिव्हिल सर्जन डॉ. रणजित राय यांनी सांगितले. दरम्यान, पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली. त्यानंतर, सिद्धू मूसेवाला यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासा घेतला असता, याप्रकरणी पाच संशयित आरोपींना अटक केली.