ताज्या बातम्या

भुसावळच्या हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडले; पाणी पातळीत वाढ

भुसावळच्या हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सुमित जोशी, जळगाव

भुसावळच्या हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुसळधार पावसाने हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. विदर्भ बुऱ्हानपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने हातनुर धरणात पाण्याची पातळी मध्ये वाढ झाली आहे.

यामुळे आता हतनुर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणात 53.20% जलसाठा शिल्लक असून हतनुर धरणातून 4 हजार 97 क्यूसेक्सने तापी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे नागरिकांना काळजी घेण्याचा आव्हान प्रशासन तर्फे करण्यात आलं आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली तर अजून दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश