Ashish Shelar  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ashish Shelar : 2024 साठी भाजपाची पूर्ण तयारी; माजी मंत्री आशिष शेलार प्रदेशाध्यक्ष होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या जागी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवीन चेहरा देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले जाईल, असे म्हटले जाते.

२०२४ ची लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्यभर फिरणे तसेच पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्याचा गुण यावरुनसुध्दा या पदासाठी निकष लावण्यात येणार आहेत. निकषही लावले जातील असे मानले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असणाऱ्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. असे देखिल सांगण्यात येत आहे.

नवे प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहऱ्याचा विचार केला तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ. संजय कुटे, आ. राम शिंदे यापैकी एकाला संधी दिली जावू शकते. त्याचवेळी मराठा समाजाचा चेहरा देण्याचे ठरले तर कोल्हापूरचे सुरेश हळवणकर, माजी मंत्री संभाजी निलंगेकर पाटील, रवींद्र चव्हाण, आ. रणधीर सावरकर यांच्यापैकी एका नावाला पसंती दिली जाईल. माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar)यांचेही प्रमुख नाव आहे.

बाबा सिद्दिकी प्रकरणी आणखीन एकाला अटक

Mohol Vidhan Sabha | मोहोळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, 'या' नेत्याने सोडली Ajit Pawar यांची साथ

Diwali 2024: यंदाची दिवाळी बळीराजासाठी काटकसरीची जाणार?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'राऊतांना शिवसेना संपवायची होती' गुलाबराव पाटलांचा आरोप, काय म्हणाले पाहा...