Gadchiroli Flood : राज्यात पावसाची जोरदार सुरवात झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे दीडशे गावांचा संपर्क तुटला आहे.दक्षिण गडचिरोलीकडून चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. त्यामुळे सहा तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला आहे.
ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळं गडचिरोली जिल्ह्यातील आठ प्रमुख मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता नागरिकांना गडचिरोलीत येण्यासाठी पूरातून मार्ग शोधावा लागत आहे. डचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून होत असलेल्या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भामरागड तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.