ताज्या बातम्या

UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन; काय आहे खास?

या मंदिराचा अभिषेक सोहळा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजे आजच पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

Published by : Team Lokshahi

BAPS मंदिर हे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE)मधील राजधानीच्या अबू मुरेखाह शेजारील पहिलं हिंदू मंदिर आहे. UAE मधील दुबईमध्ये आणखी तीन हिंदू मंदिरं आहेत. पण दगडी वास्तुकलेने तयार करण्यात आलेले BAPS मंदिर हे आखाती प्रदेशातील सर्वांत मोठं मंदिर ठरणार आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या भेटीदरम्यान UAE ने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये मंदिर प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि डिसेंबर २०१९ मध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं. मंदिराचा अभिषेक सोहळा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजे आजच पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

काय आहेत मंदिराची वैशिष्ट्य?

दुबई-अबू धाबी शेख झायेद महामार्गालगत अल रहबाजवळील अबू मुरेखाह इथे २७ एकर जागेवर पसरलेलं हे मंदिर ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे. हे मंदिर १०८ फूट उंच, २६२ फूट लांब आणि १८० फूट रुंद आहे. मंदिर परिसरात एक मोठं ॲम्फीथिएटर, प्रार्थना कक्ष, एक गॅलरी, एक ग्रंथालय, थिमॅटिक गार्डन्स, एक फूड कोर्ट, गिफ्ट शॉप, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, एक मजली इमारत आणि ५ हजार लोक सामावून घेऊ शकतील, असे दोन कम्युनिटी हॉल आहेत. ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तीव्र तापमानातही टिकाऊपणा जपणाऱ्या या मंदिराच्या दगडांची निवड यूएईकडून करण्यात आली आहे. मंदिराच्या फाउंडेशनमध्ये १०० सेन्सर्स समाविष्ट आहेत, तर ३५० हून अधिक सेन्सर्स संपूर्ण संरचनेत धोरणात्मकरीत्या बसवलेले आहेत, जे सतत भूकंप हालचाली, तापमान चढउतार आणि वातावरणातील बदलांविषयी माहिती गोळा करत आहेत.

२५ हजारांपेक्षा जास्त दगडांचे तुकडे वापरून संगमरवरी नक्षीकाम वाळूच्या दगडाच्या पार्श्वभूमीवर तयार केले गेले आहेत. मंदिरात दोन घुमट, सात शिखर आहेत. मंदिराची रचना वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. प्रत्येक शिखरावर रामायण, शिवपुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ, भगवान स्वामीनारायण, भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचं वर्णन करणारी कोरीवकामं आहेत. चिकाटी, बांधिलकी आणि सहनशीलतेचं प्रतिनिधित्व करणारे उंटसुद्धा शिल्पांमध्ये कोरले गेले आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पाच नैसर्गिक घटकांच्या सुसंवादाचे एक अद्वितीय चित्रण म्हणून “डोम ऑफ हार्मोनी” बनवण्यात आले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत