ताज्या बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली बायपास शस्त्रक्रिया यशस्वी!

पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये अमित परब यांच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया.

Published by : Vikrant Shinde

प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बायपास शस्त्रक्रियेची सोय झाली आणि श्री अमित शंकर परब या चाळीस वर्षीय रुग्णावर पडवे येथिल लाइफटाइम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधे पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हा क्षण जिल्ह्याच्या आणि लाईफटाईम हॉस्पिटलच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. अशी माहिती पहिल्याच यशस्वी शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या जिल्ह्यांत आरोग्यविषयक परिपूर्ण सेवा देण्याचे आपले स्वप्न पूर्णत्वास गेले त्याबद्दलचा आनंदही त्याने व्यक्त केला. यावेळी लाईफटाईम हॉस्पिटलच्या अध्यक्षा सौ नीलम ताई राणे व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात परिपूर्ण आरोग्यसेवा व्हावी या दृष्टीने आपले स्वप्न या जिल्ह्यातील या पहिल्याच बायपास शस्त्रक्रियेने पूर्णत्वास जात आहे. त्याचा आपल्याला मनस्वी आनंद असून या जिल्ह्यात चांगले व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मध्ये ही बायपास शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मुंबई कोल्हापूर पुणे गोवा आदी शहरांत बायपास शस्त्रक्रियेच्या रुग्णांना हलविले जात होते मात्र आमच्या या रुग्णालयात ही बायपास शस्त्रक्रिया सुविधा सुरू झाली आहे. हे जाहीर करण्यासाठी व या शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांचे अभिनंदन करण्यासाठी हा कार्यक्रम झाला. यावेळी बायपास शस्त्रक्रिया यांचे तज्ज्ञ सर्जन डॉ अमृत नेरर्लोकर डाँ विनायक माळी या बायपास शस्त्रक्रिया करणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्तार नामदार नारायण राणे यांनी केला. व त्यांचे कौतुकही केले. या बायपास शस्त्रक्रियेसाठी व या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आसावरी उपाध्याय यांनी परिश्रम घेतले असून त्यांचेही नामदार राणे यांनी कौतुक केले.

आपले हॉस्पिटल हा धंदा नाही. या जिल्ह्यात दर्जेदार रुग्णसेवा मिळावी हे आपले स्वप्न होते. त्या स्वप्नांची पूर्तता आता होत आहे आणि त्याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे असे भावनिक उद्गारही नामदार राणे यांनी यावेळी बोलताना काढले. जिल्हा व शहर जनतेचे ऋण फेडण्यासाठी या जिल्ह्यात आपण हा प्रोजेक्ट राबविला व आता बायपाससारखी शस्त्रक्रिया होऊन हॉस्पिटल प्रोजेक् पूर्णत्वाकडे गेला याबद्दलचे आपल्याला समाधान आहे. मी आणि माझ्या विरोधातील विरोधी नेते यामधे मोठा फरक आहे. या जिल्ह्यात शैक्षणिक सुविधेसाठी शाळा, कॉलेज, इंजिनीअरींग कॉलेज मेडिकल कॉलेज अशा विविध शैक्षणिक सुविधांची सोय या जिल्ह्यांत व्हावी म्हणून मी पुढाकार घेतला आहे व तो पूर्णत्वाकडे नेला आहे , असेही राणे साहेब यांनी स्पष्ट केले. लाईफटाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स नर्सेस अन्य सर्व कर्मचारी या सर्वांसाठीच हा ऐतिहासिक व आनंदाचा दिवस आहे. व या बायपास शस्त्रक्रियेच्या निमित्ताने या हॉस्पिटलमधील डॉक्टर क्टर्स व अन्य कर्मचाऱ्यांना स्फूर्ती मिळेल या रुग्णालयातून येणार्या रुग्णांना दर्जेदार रुग्णसेवा मिळेल अशी ग्वाही नामदार नारायण राणे यांनी याप्रसंगी दिली.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...