अमरावती बडनेरा मार्गावरील जुन्या एमआयडीसीत राम इंडस्ट्रीज या ऑइल रिफायनरीला आग लागली होती. आज पहाटे 6:00 वाजताच्या दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशामन दलाचे सहा बंब आतापर्यंत घटनास्थळी पोहोचले आहेत.
अग्निशमन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीत ढेप शेंगदाणा यासह फल्लीतेल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास तीन लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
बडनेरा मार्गावरील जुन्या एमआयडीसीत राम इंडस्ट्रीज या कंपनीचा खाद्यतेल कारखाना आहे. या ठिकाणी शेंगदाणा आणि इतर तेलबियांचे गाळप गेले जाते. या कारखान्यात ज्वलनशील तेलाचा मोठा साठा असल्याने आगीने लगेच रौद्र रुप धारण केले.