Raj Thackeray team lokshahi
ताज्या बातम्या

गुन्हा दाखल : FIR मध्ये राज ठाकरे पहिले आरोपी

Published by : Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा (Crime filed) दाखल झाला आहे. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) ही कारवाई केली. सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ११६, ११७ व १५३ नुसार राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे.

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्तता यांनी सभेला १६ अटी घालून परवानगी दिली होती. सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून अशोक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा

दुसरीकडे उद्याचं आंदोलन लक्षात घेता गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या 3 शहराध्यक्षांसह 40 जणांना कलम 149 अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोणी दिली फिर्याद

पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे नेमणूक सिटी चौक यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच गुरन -१२७/२०२२ आहे. भादवि कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

पहिला आरोपी राज ठाकरे

एफआयआरमध्ये पहिला आरोपी म्हणून राज ठाकरे यांचे नाव आहे. त्यानंतर राजीव जेवळीकर व इतर आयोजकांचे नाव आहे. पोलिस निरीक्षक अशोक गिरी हे तापस अधिकारी आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय