भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या आरोपांमुळे किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ईडीने संजय राऊतांवर (Sanjay Raut) कारवाई केल्यानंतर त्यांनी किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) INS विक्रांतची फाईल उघडली. याप्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यानंतर आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान सुरू केले होते. या अभियानातून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यापालांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केला, असा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर आहे. याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली होती. बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.