पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट केली होती.अनेक शहरांमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 100 रुपयांहून अधिक आहे. अशातच आता पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे.
निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 'गेल्या काही वर्षांपासून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक खर्चात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. GST परिषदेची पुढील बैठक 18 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या कक्षेत आणण्याची तरतूद आधीपासूनच आहे. माझ्याआधीच्या अर्थमंत्र्यांनीही याबाबतचा पर्याय खुला ठेवला आहे. दरम्यान, सध्या पाच पेट्रोलियम उत्पादनं कच्चं तेल, पेट्रोल, हायस्पीड डिझेल, नैसर्गिक वायू आणि विमान इंधन जीएसटीच्या बाहेर आहेत. असे सीतारमण म्हणाल्या.
तसेच त्यांनी सांगितले की, 'राज्यांनी सहमती दिल्यानंतर पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणू.' पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील.'सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च 33 टक्क्यांनी वाढवून 10 लाख कोटी रुपये केला आहे. असे सीतारमण म्हणाल्या.