शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.राज्यावर कर्जाच्या व्याजाचा बोजा 46 हजार कोटी रुपये आहे.2022-23 मध्ये राज्यावर 6 लाख 49 हजार 699 कोटी कर्ज अपेक्षित आहे.
राज्याचा हा अर्थसंकल्प नाही तर महाअर्थसंकल्प असणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.