शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सागरी सेतूवर वाहनांना किती टोल असणार, याकडे वाहनचालकांचे लक्ष होते. अखेर या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपये टोल असणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीनंतर ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल असेल असं या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलं.
देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणं शक्य होणार आहे. हा मार्ग 22 किमी लांबीचा असून जवळपास 18 किमी समुद्रातून आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचे अंतर आता अवघ्या 20 मिनिटांत कापता येईल.