ताज्या बातम्या

मुंबईतल्या कांदिवलीत गुंडाकडून महिला पीएसआयचा विनयभंग

मुंबईत पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबईत पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतल्या कांदिवलीत गणेशविसर्जनावेळी बंदोबस्तावर असलेल्या गुंड हरिश मांडवेकर आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केला आहे. कांदिवली पश्चिमेच्या डहाणूकरवाडीच्या विसर्जन तलावावर गुंड मांडवीकर यानं त्याच्या तीन साथीदारासह दादागिरी केली.

शिवाय महिला पोलिसांना धक्काबुक्की केलीय. या प्रकरणी हरीशसह दीपक पांडे, हरिष चौधरी आणि राजेश कोकिसरेकर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हरिश मांडवीकर याच्यावर तब्बल 11 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

हरिश मांडवीकर स्वतःला पोलीसांपासून संरक्षण मिळावं यासाठी अनेक राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. नेत्यांसोबत फोटो काढणं, आमदार, खासदार, मंत्र्‍यांचे बॅनर लावून पोलिसांवर अप्रत्यक्ष दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे.

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?