ताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात; आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं

पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

साईदीप ढोबळे, शिरुर

पुणे-नाशिक महामार्गावर कळंबजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातातआमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं असल्याची माहिती मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यात कळंब गावच्या हद्दीत आमदार पुतण्याच्या गाडीने रात्री 11.40 वाजता दोघांना चिरडलं आहे.

पुतण्या मयूर मोहिते दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांकडून आरोप करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातग्रस्त तरुण आंबेगाव तालुक्यातल्या कळंब गावचे रहिवाशी आहेत. पोलीस सहकार्य करत नसल्याचा ग्रामस्थांकडून आरोप केला जात आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश