मराठवाड्यातील शेतकरी पाण्यासाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाडा पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. नाशिकमधून पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नाशिकच्या धरणांमधून 11 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. नाशिकमधून 11 टीएमसी पाणी हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालय समोर आंदोलन सुरु केल्याची माहिती मिळत आहे.