चंद्रशेखर भांगे, पुणे
पुण्यात विमानाची बनावट तिकिटे तयार केली जात असल्याची माहिती मिळत आहे. या बनावट तिकिटाच्या माध्यमातून विमानतळात दोघांनी घुसण्याचा प्रयत्न केला आहे. बनावट तिकीट दाखवून विमानात चढणाऱ्या दोघांना एअरपोर्ट विभागाने ताब्यात घेतलं आहे.
सलीम गोलेखन आणि नसरुद्दीन खान असा ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. काल पुण्याच्या लोहगाव एअरपोर्टवरून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बनावट तिकिटाच्या आधारे पुणे ते लखनऊ इंडिगो कंपनीच्या विमानात या दोन्ही संशयितांनी घुसून विमान प्रवास करण्याचा प्रयत्न केला.
या दोघांनी बेकायदेशीररित्या एअरपोर्टवर घुसण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात एअरपोर्ट पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.