ताज्या बातम्या

'... तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू' रामदास कदमांच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. मात्र त्यातच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळत आहे.

Published by : shweta walge

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. मात्र त्यातच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (BJP) यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. तसंच भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असं वक्तव्यही रामदास कदमांनी केलं होतं. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत आम्हीही माणसं आहोत, आमचीही मनं दुखावतात. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचं म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकारचे आरोप करणे हे कुठल्या युती धर्मात बसते. त्यामुळे जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असे मला वाटते. तरी मी भाईंचे काय म्हणणे आहे हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, रामदास भाई असे वारंवार टोकाचे बोलतात. त्याने आमचे मनं देखील दुखावले जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. 50 गोष्टी आम्हालाही त्याच्या उत्तरावर बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही. याबाबत मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलेल, असे उत्तर त्यांनी रामदास कदम यांच्या टीकेवर दिले आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम?

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे खेड-दापोली-मंडणगड येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम उपस्थित होते. त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत, मुंबई गोवा मार्गाच्या कामाविषयी संताप व्यक्त केला. १४ वर्षांनंतर प्रभू रामाचा देखील वनवास संपला होता. परंतु मुंबई गोवा मार्गाचा आमचा वनवास संपत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी डिसेंबरमध्ये जाहीर केले होते की, पुढील गणपतीमध्ये मुंबई गोवा रस्ता पूर्ण होईल. परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. मुंबई गोवा मार्गावर खड्डे पडले आहे. परंतु चमकोगिरी करण्यासाठी पाहाणी दौरा केला जात आहे. हे पाहणी दौरे कशासाठी? खरेतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घ्यायला हवा. हे अत्यंत कुचकामी मंत्री आहेत. युती असतानाही मी हे जाहीरपणे बोलत आहे. कारण कोकणातील लोक आम्हाला जाब विचारत आहेत, अशी टीका कदम यांनी केली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी